खेड तालुका कृषि सेवा फाउंडेशन तर्फे हवामानावर आधारीत एकात्मिक शाश्वत शेती प्रकल्प अंतर्गत 'गांडूळखत निर्मिती प्रशिक्षण' मुंबई माता बाल संगोपन केंद्र, राजगुरुनगर येथे दिनांक 11.5.24 रोजी आयोजित करण्यात आले

गांडूळखत निर्मिती प्रशिक्षण

खेड तालुका कृषि सेवा फाउंडेशन तर्फे हवामानावर आधारीत एकात्मिक शाश्वत शेती प्रकल्प अंतर्गत ‘गांडूळखत निर्मिती प्रशिक्षण’ मुंबई माता बाल संगोपन केंद्र, राजगुरुनगर  येथे दिनांक 11.5.24 रोजी आयोजित करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील विविध गावातील 31 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. सौ. श्वेता गायकवाड यांनी प्रात्यक्षिकांसह विशेष मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांना यावेळी गांडूळखत  निर्मितीसाठी प्रत्येकी एक बेड आणि तीन किलो गांडूळ कल्चर मोफत देण्यात आले. या प्रसंगी खेड तालुका कृषि सेवा फाउंडेशन चे डाॅ. पोपटराव कोळेकर, मिलिंद शिंदे, प्रियांका थिगळे, बाबाजी  गाडगे, चैतन्य संस्थेच्या मंगल काळे, देशपांडे फाउंडेशन चे अमित खेडकर, पत्रकार सौ. सुषमा शिंदे मॅडम उपस्थित होते. KTKSF यांचे माध्यामातून  सुरू असलेला हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणार हे नक्की.! सर्वांचे अभिनंदन व आभार…..